इंदापूर ! हर्षवर्धन पाटील यांच्यामुळे शुभम पाडुळे त्याच्या घरी सुखरूप परत राजवर्धन पाटील यांनी घेतली शुभम ची भेट
इंदापूर - इंदापूर तालुक्यातील कालठण नंबर 2 येथील शुभम संदीप पाडुळे हा विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकला होता. तेथे चालू असलेल्या युद्धामुळे शुभमचे कुटुंबीय चिंतेत होते. महाराष्ट्राचे माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते मा.हर्षवर्धनजी पाटील यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करत शुभमला मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करत होते. नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक चि.राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी ही शुभम सोबत व्हाट्सअप कॉल द्वारे संपर्क करत त्याला धीर देत व आपुलकीने त्याची विचारपूस करत होते.
भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या प्रयत्नांमुळे शुभम परवा त्याच्या कालठण येथील घरी पोचला. आज नीरा-भीमा चे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी कालठण येथील शुभम च्या घरी जाऊन त्याची विचारपूस केली व त्या सोबत संवाद साधत युक्रेन मध्ये असलेल्या परिस्थितीबाबत चर्चा केली. मा. हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शुभम सुखरूप रित्या लवकर घरी पोहोचला त्याबद्दल पाडुळे कुटुंबीयांनी आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब यांचे आभार व्यक्त केले.