सोमेश्वरनगर ! वाघळवाडी येथील विविध विकास कामांचे उद्घाटन
सोमेश्वरनगर - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाघळवाडी येथे आज एक लक्ष लिटर क्षमतेची पिण्याच्या पाण्याची टाकी, संत सावता माळी मंदिर ते अंबामाता मंदिर पेवर ब्लॉक रस्ता, ज्योतिबा मंदिर सभामंडप, अंबामाता मंदिर सभामंडप, ग्रामपंचायत कार्यालय नूतनीकरण इत्यादी कामांचे उद्घाटन केले.
यावेळी झालेल्या सभेत श्री. पवार म्हणाले, वाघळवाडीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. नीरा बारामती रस्त्याचे रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. नागरीकांनी रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करू नये. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी गावच्या विकासासाठी एकजुटीने काम करावे त्यासाठी चांगल्या गावाचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, प्रमुख उपस्थिती बारामती राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, बारामती पंचायत समिती सभापती नीता फरांदे, बारामती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल, सरपंच नंदा सकुंडे, उपसरपंच जितेंद्र सकुंडे , राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष सतीश सकुंडे, राष्ट्रवादी शिक्षक सेल शहराध्यक्ष अविनाश सावंत, समर्थ ज्ञानपीठ अध्यक्ष अजिंक्य सावंत, ग्रामपंचायत सदस्य हेमंत गायकवाड, पांडुरंग भोसले, चेतन गायकवाड, शीला सावंत, लता शिंदे, राष्ट्रवादी महिला सरचिटणीस सुचिता साळवे, ग्राम विकास अधिकारी नरसिंग राठोड, माजी उपसरपंच गणेश जाधव, तुषार सकुंडे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते