महावितरण ने बसवलेला स्ट्रक्चर त्वरित घेऊन जा...त्या गावातील ग्रामसभेचा ठराव.
देऊळगावराजे - शेती पंपाची वीज त्वरित चालू करा नाहितर महावितरण कंपनी ने हिंगणीबेर्डी येथे बसवलेले स्ट्रक्चर त्वरित घेऊन जा असा निर्णय ग्रामसभेत एकमताने घेण्यात आला आहे हिंगणी बेर्डी चे , सरपंच मनीषा यादव यांच्या अध्यक्षतेखाली दि.१० रोजी विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली होती, या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते, ही ग्रामसभा ओंकार तापकीर या युवा शेतकऱ्याच्या मागणीवरून बोलावली होती,ग्रामसभेत मागणी करण्यात आलेल्या बाबी पुढील प्रमाणे शेतकऱ्यांचा खंडित वीज पुरवठा त्वरित पूर्ववत करावा,महावितरण कंपनीने विनापरवाना बसवलेले स्ट्रुक्चर काढावे किंवा नियमितपणे भाडे सुरू करावे,शॉर्ट सर्किट होऊन नुकसान झाल्यास नुकसानभरपाई द्यावी, वीज पुरवठा ८तास आणि भाडे २४तासाचे का?,विज बिल दुरुस्ती स्थानिक पातळीवर व्हावी,ज्या शेतकऱ्यांना एचपी नुसार बिल येते त्यांना तीन चार महीने सूट द्यावी कारण चार महीने पावसाळा असतो, आणि महावितरण कंपनीने त्यांचा रिपेरिंग खर्च पूर्ण त्यांनीच करावा यामधे डीपी, केबल, ऑइल याची पूर्तता करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या आता महावितरण कंपनी या मागण्याचे काय करणार हे पुढील काळात पहावे लागणार आहे. यावेळी सरपंच मनीषा यादव ,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कदम,त्रिम्बक भोसले,दादा माने ,संभाजी खैरे,बापू रणसिंग ,ग्रामसेवक मचिंद्र निगडे आदि उपस्थित होते.
सत्ताधारी पक्षाचे नेते नुसते गावामध्ये निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विकास कामाची उद्घाटन करीत आहेत पण विकास कामांनबरोबर शेतकरी यांची उपजीवी का ज्या शेतीवर अवलंबून त्या शेतीला मागील अनेक दिवसांपासून महावितरण कंपनीने वीज पुरवठा बंद केला आहे त्यावर कोणी बोलायला तयार नाही हिंगणी बेर्डी ग्रामपंचायततीने आज जो निर्णय घेतला आहे योग्य असून येथून प्रत्येक ग्रामपंच
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोल्हापूर येथील माणगाव ग्रामपंचायत तिला महावितरण कंपनी भांडे देण्यात यावे असा आदेश दिला आहे त्यानुसार हिंगणी बेर्डी ग्रामपंचायत तिने स्वतः ग्रामपंचायत हद्दीमधील महावितरणचे खांब डीपी मोजून त्याचे भाडे २००५ पासून 4 कोटी ८०,०००/- रुपये होत आहे याबाबत महावितर