करंजे विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील
करंजे विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणूक बिनविरोध झाली.यामध्ये १३ जागांसाठी १३ उमेदवारांकडून अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. चेअरमन अनिल गायकवाड व माजी चेअरमन बाळासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ताधारी गटाच्या सर्व १३ जागा बिनविरोध झाल्या.
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार ....
शेंडकर महेंद्र हनुमंत,शेंडकर राहुल निवृत्ती, शेंडकर महेंद्र विठ्ठल, गायकवाड शशिकांत एकनाथ,गायकवाड विठ्ठल नामदेव ,गायकवाड तानाजी महादेव , गायकवाड कुणाल कांतीलाल
, गायकवाड साहेबराव दगडू , शेंडकर कुसूम बाळासोा,गायकवाड शकुंतला अरविंद , गायकवाड रविंद्र काशिनाथ ,गायकवाड शहाजी गुलाब ,गायकवाड वैभव अशोक. आहे तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस एम बोबडे आणि सचिव दीपक शिर्के यांनी कामकाज पाहिले.
करंजे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाने आत्तापर्यंत बँक पातळीवर प्रत्येक वर्षी शंभर टक्के वसूल केलेला असून संस्थेचे एकूण 600 सभासद आहेत तसेच आतापर्यंत 60 लाख भाग भांडवल , 2020 - 21 मध्ये 10% लाभावंश सभासदांसाठी दिलेला आहे , तसेच या संस्थेची इमारतीचे नूतनीकरण करत सुसज्ज असे ऑफिसही आहे , अत्यंत पारदर्शकपणे व सर्वांना बरोबर घेऊन संस्थेचा कारभार केल्यामुळे तसेच कोरोना काळ असतानासुद्धा सोसायटीने दिलेला चंगला लाभांश यामुळे सभासदांनी आमच्यावर सार्थ विश्वास टाकल्याने निवडणूक बिनविरोध झाली असल्याचे बोलताना सांगितले.