सोमेश्वरनगर ! करंजेपुल सरपंच वैभव गायकवाड यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजेपुल येथील सरपंच वैभव अशोकराव गायकवाड यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित केले आहे .सदर पुरस्कार जिल्हा परीषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला .
पुणे जिल्हा परिषद, पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा सन २०१९-२० या वर्षाचा आदर्श जिल्हा परीषद सदस्य , सरपंच , ग्रामसेवक ,शाखा अभीयंता , गुणवंत शिक्षक , विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. २० रोजी संपन्न झाला. गणेश कला क्रीडा मंच पुणे येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परीषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे , उपाध्यक्ष रणजित शिवतारे आणि पुणे जिल्हा सभापती बांधकाम व आरोग्य समिती प्रमोद काकडे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी करंजेपुलचे मा. सरपंच आप्पासाहेब गायकवाड, करंजे सोसायटी मा चेअरमन अनिल गायकवाड, सोमेश्वर कारखाना मा संचालक विशाल गायकवाड, सदस्य लतीफ मुलाणी, बाळू गायकवाड, अशोक गायकवाड, संभाजी गायकवाड, एस एस गायकवाड आदी उपस्थित मान्यवर होते.