इंदापूर ! छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल बदनामीकारक महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोसारी बोलल्याबद्दल इंदापूर या ठिकाणी सर्व पक्ष व सामाजिक संघटना वतीने निषेध
इंदापूर - औरंगाबाद या ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोसारी यांनी जर समर्थ रामदास नसते तर शिवाजीला कोणी विचारले नसते. असे उद्गार काढले वास्तविक पाहता सर्व इतिहास व संशोधकांनी रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. हे पुराव्यानिशी सिद्ध केलेले आहे. त्याचबरोबर औरंगाबाद खंडपीठाने रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. अशा पद्धतीचा निकाल एका प्रकरणामध्ये दिलेला आहे. तरी देखील एक जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तीने न्यायालयाचा अवमान केलेला आहे. त्यामुळे न्यायालयाचा अवमान प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. अन्यथा सर्व पक्ष कार्यकर्त्यांच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असे निवेदन इंदापूर या ठिकाणी असणाऱ्या सर्व पक्ष व सामाजिक संघटना यांनी इंदापूर तहसीलदार यांच्याकडे दिले आहे. या निवेदना वरती प्रतीक झोळ मराठा सेवा संघ कार्याध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते हमीद आतार, नानासाहेब चव्हाण भारत मुक्ती मोर्चा, शिवाजीराव मखरे आरपीआय आठवले गट, संदिपान कडवळे आरपीआय तालुकाध्यक्ष, स्वप्निल देशमाने, हनुमंत कांबळे वंचित बहुजन आघाडी, प्रकाश पवार मोर्या क्रांती संघ इंदापूर शहराध्यक्ष, वसीम भाई बागवान कार्याध्यक्ष राष्ट्रवादी इंदापूर शहर, नितीन देशमाने कार्याध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा इंदापूर, आयु.महादेव भगवान लोंढे सचिव इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी, सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब माने, विजय इंगोले, बापु जामदार संतोष शिरसागर इंदापूर शहर अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी यांनी सही केलेल्या आहे