इंदापूर - इंदापूर शहराच्या व तालुक्याच्या वैभवात भर घालणारी बाब म्हणजे क्रीडा संकुल होय.तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील खेळाडु व नागरिकांच्या सुदृढ आरोगया किरता या क्रीडासंकुलाचा वापर होत असतो. दिवसेन दिवस या क्रीडा संकुलाचा कायापालट मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. याचाच एक भाग म्हणून इंदापूर शहर वासीयांना व खेळाडूंना मंत्री महोदय यांनी या क्रीडा संकुलामध्ये सिंथेटीक लाॅन-टेनिस या मैदानाची निर्मिती करण्यात येणार आहे. या मैदानात करिता पहिल्या टप्प्यात 31 लाख रुपये चा निधी सन 2021- 22 या वर्षाच्या जिल्हा वार्षिक निधीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून हा निधी मंजूर केला आहे. यापूर्वीच क्रीडा संकुलामध्ये बास्केटबॉल, स्केटिंग, बॅडमिंटन हॉल, ४०० मीटर धावणे मार्ग, क्रिकेट मैदान, फुटबॉल, धनुर्विद्या, कबड्डी, खो-खो इत्यादी विविध सोयी सुविधांची निर्मिती खेळाडून करिता करण्यात आली आहे. तसेच क्रीडा विकासाचा भाग म्हणून सरस्वती नगर ते क्रीडा संकुल या रस्ता करिता २० लाख रुपये व रस्त्याच्या बाजूस विद्युतीकरणांस १० लाख रुपयांचा निधी मंजूर करीत असल्याची घोषणा मा. राज्यमंत्री दत्त मामा भरणे यांनी केली आहे. क्रीडा संकुलास आधुनिक स्वरूपा व महाराष्ट्रातील एक दर्जेदार संकुलाची उभारणी मा. मंत्री महोदय यांच्या अधिपत्याखाली होत आहे. पुढील काळात इंदापूर शहर वासियं करीता २ कोटी रुपये जलतरण पूल ची निर्मिती करण्यात येणार आहे याबाबत ची अंतिम प्रक्रिया निर्णायक टप्प्यात आली आहे. असेही मंत्री दत्तमामा भरणे यांनी सांगितले