इंदापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत इंदापूर तालुक्यातील शैलेश देवराव मोरे, दिपाली शिवाजी धालपे, चेतन अनिल ढावरे, अशोक बाळासाहेब नरूटे यांची पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एका अतिशय प्रामाणिक व कर्तबगार पोलीस अधिकारी म्हणून आपण आपले व आपल्या तालुक्याची शान वाढवावी. आपल्या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी, कायदा व सुव्यवस्थेसाठी सर्वांना सोबत घेऊन आपण काम करावे, असे हर्षवर्धनजी पाटील सत्कार प्रसंगी म्हणाले.