मातोश्री पानंद रस्ते योजनेतून इंदापूर तालुक्यासाठी १६५ किलोमीटर रस्ते मंजूर :-राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे.
इंदापुर - वडापुरी पंचायत समिती गणात विविध विकास कामाचे भूमिपूजन उद्घाटन समारंभ राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते झाले, ४९ कोटी च्या विकास कामाचे भूमिपूजन झाल्यानंतर शहा येथील जाहीर सभेत राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे बोलत होते तालुक्याचा चौफेर विकास करीत असताना त्यात भर म्हणून सरकारची नवीन योजना मातोश्री पानंद रस्ते यातून तालुक्यासाठी १६५ कि. मी. चे रस्ते मंजूर केले आहेत एका किलोमीटर ला २५ लाख रूपये अशी ही योजना आहे .
वडापुरी पंचायत समिती गणात व एकट्या शहा गावामध्ये बारा कोटी पंधरा लाख रूपये च्या विविध विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ जिल्हाध्यक्ष प्रदिप दादा गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी तालुक्यातील मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व शहा गावातील नागरीक उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांनी तालुक्यासाठी शासनाच्या तिजोरीतून खेचून आणलेला निधी व ती कामे याचा पाढा भर सभेत वाचून दाखविला व विरोधकांना अशी कोपरखळी मारली की यांच्या पेनातील शाई संपून जाईल इतका विकास निधी इंदापूर तालुक्यासाठी आणलेला आहे. आता विकासाचे काम माझ्यावर सोडा असे म्हणत कार्यकर्त्यांना असेही सांगितले की समोरच्या गोरगरीब माणसाला मान द्या व त्यांची कामे करा तो गरीब माणूस हे उपकार कधीही विसरणार नाही.
यावेळी राजेंद्र तांबिले,प्रताप पाटील, बाळासाहेब करगळ, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर, सोशल मीडिया प्रमुख हमा पाटील, जि.प.सदसय हनुमंत बंडगर, जि. प. सदस्य अभिजीत तांबिले, या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अनेक गावचे सरपंच सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन व संचालक, तालुक्यातील नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे यांनी केले.