'सोमेश्वर'सह तालुक्यात अल्हाददायक पाऊस ; उन्हाळा सुरू होताच पावसाने थंड वातावरणाचा अनुभव.
पावसामुळे थंड झाला आहे
सोमेश्वरनगर - बारामतीतील सोमेश्वरनगर सह तालुक्यातील इतर गावांमध्ये अचानक पाऊस पडल्यामुळे सर्वांची धांदल उडाली त्याचबरोबर शेतात असणारी गहू कांदा, मका, हरभरा पिक याचे नुकसान व भीतीही शेतकऱ्यांना वाटू लागली आहे .जर पाऊस असाच स्वरुपात राहिला तर शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे नुकसान होणार आहे सध्या मार्च महिन्याची उन्हाळ्यातील लाहीलाही लक्षात पाहतात उष्णतेमुळे पडलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र थंड वातावरणामुळे उष्णता कमी होणार आहे याचेही समाधान आहे.