शहा येथे १२ कोटी १५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते होणार- सतीश पांढरे
इंदापूर ,इंदापूर तालुक्यातील शहा येथे राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये १२ कोटी १५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ रविवार दिनांक ६ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता शहा या गावामध्ये आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे यांनी दिली. यावेळी त्यांनी या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप दादा गारटकर, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, प्रताप आबा पाटील, राजेंद्र तात्या तांबिले, सचिन सपकाळ, प्रवीण भैय्या माने, अभिजीत तांबिले, हनुमंत बंडगर, अतुल झगडे तसेच वडापुरी गावातील कार्यकर्ते पदाधिकारी इतर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची सतीश पांढरे यांनी सांगितले