Type Here to Get Search Results !

लोणी भापकर ! बारामतीतील लोणी भापकर येथे गतीरोधक बसवण्याची मागणी

लोणी भापकर ! बारामतीतील लोणी भापकर येथे गतीरोधक बसवण्याची मागणी
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथील मुख्य चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,आण्णाभाऊ साठे चौक व इतर चार ते पाच ठिकाणी गतीरोधक बसवण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
  शिरूर-फलटण राज्य मार्गावर लोणी भापकर हे गाव असून पळशी-सायंबाचीवाडी व मुढाळे-सुपे हे रस्ते या मुख्य चौकालगत जोडले गेलेले आहेत. रस्ते चांगले झाल्याने वाहने गावातूनही सुसाट सुटत आहेत. या राज्य मार्गाने जाणारी वाहने ओव्हरलोड व धोकादायक पद्धतीने ट्रक, हयवा, पिकअप भरधाव वेगाने जातात. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. हे टाळण्यासाठी चौकात चारही बाजूला गतीरोधक बसवण्यात यावे.
   ग्रामपंचायत पदाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व संबधितांनी याची दखल घ्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अविनाश बनसोडे, नंदकुमार मदने, अमोल सकाटे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test