इंदापूर ! इंदापूर तालुक्याकरिता अर्थसंकल्पातून १६० कोटींचा निधी मंजूर :-सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
इंदापूर प्रतिनिधी- दत्तात्रय मिसाळ - अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च २०२२ नुकतेच पार पडले या अर्थसंकल्पामध्ये इंदापूर तालुक्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत १६० कोटी १५ लक्ष इतका निधी मंजूर झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली इंदापूर तालुक्यातील रस्त्यांची बरेच वर्षांपासून मागणी प्रलंबित होती प्रत्येक गावागावातून रस्त्याची मागणी होत होती याचाच विचार करून दळणवळणाच्या दृष्टिकोनातून सामान्य नागरिक व शेतकरी व औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे अशा रस्त्याची मंजुरी यावेळी देण्यात आली यामध्ये १)पिठेवाडी बावडा भगतवाडी ते कचरेवाडी
एकूण लांबी ८ किमी
रक्कम ९ कोटी ५० लक्ष
२) नॅशनल हायवे ९ ते राऊतवाडी गायकवाड वस्ती पाटील वस्ती बेंद वस्ती माळवाडी ते इंदापूर रस्ता एकूण लांबी १४ किमी
रक्कम १६ कोटी १५ लक्ष
३) गोंदी ते ओझरे गिरवी ते शिरसागरवस्ती पाटील वस्ती ठोकळे वस्ती रस्ता एकूण लांबी ११ किमी
रक्कम १२ कोटी ३५ लक्ष
४) रा म मार्ग ९६५ ते झगडेवाडी वडापुरी ते शेटफळ हवेली नीरा भीमा कारखाना ते लाखेवाडी रस्ता
एकूण लांबी १५ किमी
रक्कम १७ कोटी १० लक्ष
५)इंदापूर -शिरसोडी रस्ता ते माळवाडी ठाकुरवाडी पेटकर वस्ती चिंदादेवी आजोती टाकळी पडस्थळ रस्ता
एकूण लांबी १६ किमी
एकूण रक्कम १८ कोटी ५ लक्ष
६) मत्स्य बीज केंद्र ते भांगे वस्ती ननवरे वस्ती ते कांदलगाव भास्कर पाटील वस्ती ते खामगळ वस्ती रस्ता एकूण लांबी १० किमी
रक्कम ११ कोटी ४० लक्ष
७) पळसदेव मराडेवाडी ते कळस ते बोरी रस्ता
एकूण लांबी ८ किमी
रक्कम ७ कोटी ६० लक्ष
८) भवानीनगर कारखाना मागील बाजू ते सपकळवाडी उदमाईवाडी मानकरवाडी मोरे वस्ती उद्धट ते पवारवाडी रस्ता
एकूण लांबी १० किमी
रक्कम ११ कोटी ४० लक्ष
९) अंथुर्णे ते शिरसटवाडी निमसाखर रस्ता एकूण लांबी १० किमी
रक्कम १२ कोटी ३५ लक्ष
१०) बंबाडवाडी चव्हाणवाडी परीटवाडी सावंतवाडी ते फडतरे नॉलेज सिटी कळंब ते रत्नपुरी रणगाव रस्ता
एकूण लांबी १२.५०० किमी
रक्कम ८ कोटी ५५ लक्ष
११) अंथुर्णे ते भरणेवाडी रस्ता काँक्रीट करण करणे
एकूण लांबी १.५ किमी
रक्कम ३ कोटी ८० लक्ष
१२) सणसर ३९ फाटा ते काझड अकोले सीनारमास रस्ता
एकूण लांबी १३ किमी
रक्कम १५ कोटी
१३) इंदापूर तालुक्यातील बी.के.बि.एन रस्त्यावरील जांब निमसाखर निरवांगी गावातील हद्दीतील लांबीत गटार बांधकाम करणे व गटरापर्यंत रुंदीकरण करणे
रक्कम ६ कोटी
१४) सार्वजनिक बांधकाम उपविभाग इंदापूर अधिकारी कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकाम
२ कोटी ६७ लक्ष
१५) इंदापूर येथे अतिमहत्त्वाच्या व्यक्ती साठी चार व्हिआयपी कक्ष बांधकाम
३ कोटी ५५ लक्ष
१६) भिगवण येथे विश्रामगृह विस्तारित इमारत बांधकाम
३ कोटी १० लक्ष
१७)सार्वजनिक बांधकाम उपविभाग भिगवण इमारत बांधकाम
१ कोटी ५८ लक्ष. एवढी कामे मंजूर करण्यात आलेली आहेत