श्री मोरया विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन पदी नितीन तावरे तर व्हाइस चेअरमन पदी शिवदास गायकवाड यांची बिनविरोध निवड.
मोरगाव : श्री मोरया विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झाल्यानंतर आज चेअरमन व व्हाईस चेअरमची निवड संपन्न झाली . यामध्ये चेअरमन पदी नितीन पोपट तावरे तर व्हाइस चेअरमन पदी शिवदास दिगंबर गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली .
आज चेअरमन पदाच्या निवड प्रसंगी सुनील दत्तात्रय तावरे , संजय प्रभाकर तावरे , गोरख दिनकर सणस , चंद्रकात हरीदास नेवसे , सुशील सिद्राम तावरे , नितीन पोपट तावरे , नवनाथ रामचंद्र नेवसे, शिवदास दिगंबर गायकवाड , मनिषा बाबा पालवे, एकनाथ विठोबा थोरात ,पोपट काशीनाथ तावरे , पोपट श्रीमंत ढोले,मंदाकीनी मारुती तावरे हे सदस्य उपस्थित होते . माजी सरपंच पोपट सर्जेराव तावरे यांच्या श्री गणेश मयुरेश्वर सर्वधर्म विकास पॅनलच्या सदस्यांपैकी नितीन पोपट तावरे व शिवदास दिगंबर गायकवाड यांनी अनुक्रमे चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी अर्ज दाखल केले .
निवडणूक निर्णय अधीकारी म्हणून पाटणे यांनी कामकाज पाहीले . नवनिर्वाचीत पदाधीकाऱ्यांचा सत्कार माजी सरपंच पोपट तावरे व साहाय्यक निबंधक मिलींद टांगसाळे यांनी केला . या निवडीनंतर बोलताना चेअरमन नितीन तावरे यांनी सांगितले की सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन शेतकरी हिताचे निर्णय व पात्र लाभधारक शेतकऱ्यांची कर्जप्रकरणे अधीकाधीक मार्गींलावणार असल्याचे सांगितले.