Type Here to Get Search Results !

...आणि शाळेतील तो चंदू आठवला.

...आणि शाळेतील तो चंदू आठवला.
सोमेश्वरनगर 
काल सायंकाळी अचानक चंदूचे जाणेची वाईट बातमी कळाली अन खूप उदास वाटू लागले..मन २७ वर्ष मागे भूतकाळात गेले आणी शाळेतील तो चंदू आठवला..मागील बेंचवर बसणारा , सर्वांच्या खोड्या काढणारा, शिक्षकांचा ओरडा खाणारा, पण जिवाला-जीव देणारा, उत्साही, तेजस्वी मित्र चंदू उर्फ चंद्रकांत पवार ..PT चा तास त्याला खूप आवडत असे, sports व exercise हे आवडते छंद..शाळेत व night study ला कायम हजर असायचा, वर्गातील मोजक्याच उंच मुलांपैकी एक, पेपर लिहीताना आवर्जुन उत्तरे विचारणारा, विचारांनी प्रगल्भ असा आमचा मित्र चंदू ….
  एका गेट-टुगेदरला मागे शाळेत भेटला, एक चांगला शेतकरी आणी मुलांनादेखील चांगले शिक्षण देऊन मार्गी लावणार आहे असे म्हटला..त्यानंतर ही कधी आठवण आली की आवर्जुन फोन करायचा, शाळेतील आठवणी सांगायचा…सगळे काही व्यवस्थित चालले होते…
अन अचानक ही अशी बातमी….खूप वाईट वाटले…
सर्वांच्या आयुष्यात चढ-उतार चांगले -वाईट प्रसंग येतच असतात, पन मनाची वाईट अवस्था असेल तेव्हा आपले मित्रांशी बोलले पाहीजे..रागातून -दुःखातून घेतलेले निर्णय नंतर पश्चातापास कारण ठरतात..काही वेळी या निर्णयांमुळे तर परिस्थिती हाताबाहेर जाते..आणी कोणीच काही करू शकत नाही…
त्यामुळे माझी सर्व मित्रांना विनंती आहे की अशी कधी वेळ आलीच तर आपल्या जवळच्या मित्रांशी बोला, नक्कीच मार्ग निघेल..
वाईट वेळ व परिस्थिती निघून जाते पण गेलेला माणूस परत येत नाही…
तो फक्त आठवणीत राहतो..
मित्र चंदू पवार  तुला साश्रु अंतःकरणाने निरोप 
भावपूर्ण श्रद्धांजल.


● वर्ग मित्र अजित पाटील , कोल्हापूर...
      

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test