निमगांव केतकी या ठिकाणी होणार भव्य शेतकरी मेळावा
इंदापूर - निमगांव केतकी या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टी, शेतकरी संघटना, राष्ट्रीय किसान मोर्चा, व सहयोगी संघटना यांच्या वतीने शुक्रवार दिनांक ११ मार्च २०२२रोजी सायं. ५ वाजता निमगांव केतकी तालुका इंदापूर याठिकाणी भव्य शेतकरी मेळावा होणार आहे. मेळाव्यासाठी अध्यक्षता म्हणून बहुजन मुक्ती पार्टी चे राष्ट्रीय महासचिव एडवोकेट राहुल मखरे तर उद्घाटक म्हणून शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाअध्यक्ष पांडुरंग रायते हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी वीज बिल वसुली चा बळी ठरलेला शेतकरी मयत सुरज जाधव पंढरपूर यांना श्रद्धांजली अर्पण व शोकसभा होणार आहे. तसेच घरगुती व कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याचे तात्काळ थांबवले पाहिजे, किमान वेतन कायद्याप्रमाणे शेतकऱ्यांना कमीत कमी पाचशे रुपये मजुरी मिळावी, दिनांक 19 जून 2017 ते आज अखेरपर्यंतची दुध दर फरकातील रक्कम दूध उत्पादकांना मिळाले पाहिजे, दोन कारखान्यातील अंतराची अट रद्द करून सी. रंगराजन समितीच्या सूत्राप्रमाणे ७०/३० धोरण लागू झाले पाहिजे, मका, गहू, ज्वारी, बाजरी इत्यादी पिकांना हमीभाव प्रमाणे दर न देणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे परवाने रद्द झाले पाहिजे, सुशिक्षित बेरोजगारांना दिलेली कर्जे सरसकट माफ झाली पाहिजेत, शेतकऱ्यांची भाकड जनावरांची खरेदी- विक्री साठी शेतकऱ्यांना परवानगी मिळाली पाहिजे, महिला बचत गट व मायक्रो फायनान्स ची सक्तीची वसुली तात्काळ थांबवावी, ओबीसी जाती निहाय जनगणना न करणे हे शासक जातीचे षड्यंत्र या विषयांवर निमगांव केतकी या ठिकाणी भव्य शेतकरी मेळावा होणार आहे यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून हनुमंत वीर, नानासाहेब चव्हाण, राहुल शिंगाडे, गोरक्ष बारवकर, गुलाबराव फलफले, बाबासाहेब भोंग, तात्यासाहेब वडापुरे, सचिन देशमाने, अतुल आप्पा मिसाळ, हरिदास पवार, अस्लमभाई मुलानी, दादासो किरकत, विजय चव्हाण सर, महेश लोंढे, मंगेश घाडगे, संजय राऊत, संतोष शिरसागर, भारत मिसाळ हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती एका पत्रकाद्वारे अडवोकेट किरण लोंढे व सुरज धाईजे यांनी दिली