इंदापूर - लाकडी येथे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण युवक-युवतींचा व सोसायटीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संपन्न.
इंदापूर प्रतिनीधी दत्तात्रय मिसाळ- इंदापुर तालुक्यातील युवक-युवती ह्या जिद्द व बुद्धिमत्तेच्या जोरावर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करीत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. आगामी काळात राज्यभर विविध पदांवर काम करताना या युवक-युवतींनी इंदापुर तालु्क्याचे नाव उंचावण्याचे काम करावे, असे आवाहन भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
लाकडी (ता.इंदापुर) येथे शनिवारी (दि.26) स्पर्धा परिक्षांमधून पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या प्रतिक्षा ग्यानदेव वणवे, निलेश ओंबासे, सौं.अर्चना ज्ञानदेव दराडे-घुगे यांचे पालक तसेच लाकडी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब ढोले, उपाध्यक्ष पांडुरंग वणवे व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना हर्षवर्धन पाटील यांनी वरील आवाहन केले. यावेळी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, मारुतराव वणवे, देवराज जाधव, पराग जाधव, विश्वास देवकाते, मानसिंग जगताप, रणजित निकम, संपत बंडगर, दत्तु गेना वणवे, नारायण वणवे आदी उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, सध्या विद्यार्थी व शेतकरी या दोन्ही घटकांसाठी परिक्षांचा काळ आहे, अशा वेळी राज्य सरकार असंवेदनशीलपणे वीज तोडुन विद्यार्थी व शेतकऱ्यांची परिक्षा घेत आहे. सहा महिन्यात ४ वेळा वीज तोडणारे शासन हे शेतकरी, जनतेच्या विरोधी आहे. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी विविध पदांवर निवड झालेली युवक-युवती व सोसायटीचे पदाधिकारी, संचालक मंडळ यांचे अभिनंदन केले. व शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, भाजप नेते मारुती वणवे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक माजी सरपंच रायचंद वणवे यांनी केले. सुत्रसंचालन माजी सरपंच भास्कर वणवे तर आभार दत्तात्रय राजाराम वणवे यांनी मानले.