पॅराग्लायडींग हॉट बलून उड्डाणांना बंदी
पुणे दि.4: पंतप्रधान महोदय यांचा 6 मार्च रोजी पुणे शहरात दौरा होणार आहे. त्या अनुषंगाने व्हीव्हीआयपी यांच्या दौऱ्यानिमित्त सुरक्षिततेसाठी पुणे शहर व जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलून इत्यादी उड्डाणांना निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
पंतप्रधान यांच्या दौऱ्यानिमित्त व्हीव्हीआयपी यांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी ५ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ६ मार्चच्या मध्यरात्री १२ वा. पर्यंत पुणे शहर व जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलून अशा प्रकारची अवकाश उड्डाणे करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
आदेशाचे उल्लघंन केल्यास भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ नुसार दंडनियम कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
000