Type Here to Get Search Results !

'त्रिदल सैनिक सेवासंघ,महाराष्ट्र राज्य'च्या बारामती तालुका अध्यक्षपदी सोमेश्वरचे माजी सैनिक प्रशांत शेंडकर यांची निवड.

'त्रिदल सैनिक सेवासंघ,महाराष्ट्र राज्य'च्या बारामती तालुका अध्यक्षपदी सोमेश्वरचे माजी सैनिक प्रशांत शेंडकर यांची निवड.
सोमेश्वरनगर - 'त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य', बारामती तालुका अध्यक्षपदी सोमेश्वरचे माजी सैनिक प्रशांत अरविंद शेंडकर यांची निवड झाली , ही निवड त्रिदल सैनिक सेवा संघ,महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदीपभाऊ लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही संघटना आजी माजी सैनिक संघटना असून  महाराष्ट्रातून  तसेच विविध जिल्हा तालुक्यातून काम करत आहे असे असताना बारामती तालुक्यात ही संघटना स्थापन करण्याचे नियोजन तसेच त्रिदल  सेवा संघ संघटना ची बारामतीतील सोमेश्वरनगर मध्ये मुख्य शाखा व उपशाखा माळेगाव मध्ये स्थापन  करण्याचे आयोजनही केले. 
   बारामतीतील मुढाळे येथील  सैनिक सुनील दरेकर  यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात ते उपस्थित होते, त्या प्रसंगी बारामती तालुक्यातही बहुसंख्येने आजी-माजी सैनिक उपस्थित होते ,याप्रसंगी सैनिकांच्या जीवनातील असणाऱ्या अनेक अडीअडचणी तसेच  त्यांचे हक्क विषयावर चर्चा झाली.  अध्यक्ष संदीपभाऊ लगड यांना मार्गदर्शनाखाली  त्रिदल सेवा संघाची मुख्य शाखा सोमेश्वरनगर या ठिकाणी  असेल  तसेच माळेगाव येथील सुनील लोखंडे  यांच्या माध्यमातून उपशाखा असेल असेही सांगितले ,उपस्थित आजी माजी सैनिकांमध्ये कार्यकारणीची ही बैठक घेण्यात आली.
बारामती तालुका कार्यकारणी बैठकीत  ठरवल्याप्रमाणे बारामती तालुका अध्यक्ष  प्रशांत शेंडकर ,उपाध्यक्ष विठ्ठल भापकर तर सचिव सुनील लोखंडे ,सहसचिव लतीफ इनामदार ,कोषाध्यक्ष विजय गोलांडे ,कोर कमिटी सदस्य दिपक जगताप , मोहन ठोंबरे  अशी सर्वानुमते निवड करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test