महान स्वतंत्रतासेनानी, शहीद भगतसिंग, राजगुरु, सुखदेव या वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘शहीद दिनी’ कृतज्ञतापूर्वक अभिवादन
देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत फासावर गेलेले थोर स्वतंत्रतासेनानी, महान क्रांतीकारक, शहीद भगतसिंग, राजगुरु, सुखदेव या महान वीर देशभक्तांची आज पुण्यतिथी. भारतमातेच्या या वीर सुपुत्रांचा त्याग, बलिदान आपल्या सर्वांना देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित ठेवण्यासाठी प्रेरणा देईल. आजच्या ‘शहीद दिनी’ देशाच्या महान सुपुत्रांना, शहीद वीरांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन..