सोमेश्वरनगर - महिला सदृढ असल्या तर कुटुंब सदृढ असते. कुटुंबाची जबाबदारी मूलतः महिला सांभाळत असतात. महिलांनी स्वतः च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून कुटुंब सांभाळायचे म्हटले तर तो एकखांबी डोलारा विस्कटून जाईल,म्हणून मुलींनी लहानपणापासूनच वैयक्तिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आयुर्वेदाचार्य अश्विनी निगडे महिला दिनानिमित्त केले.
उत्कर्ष माध्यमिक आश्रमशाळेत जागतिक महिला दिनानिमित्त बोलताना विद्यार्थ्याची दिनचर्या कशी असावी, आहाराचा आचार विचारांवर कसा परिणाम होतो, दैनंदिन व्यायामाचे महत्व अशा विविध विषयांवर प्रस्नोत्तराच्या माध्यमातून चर्चा केली.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आश्रमशाळेतील मुलींनी कर्तबगार स्त्रियांच्या वेशभूषा साकारल्या तसेच महिला शक्तीचा जागर करणारे नृत्य सादर केले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी सर्व शिक्षकांचा पेन आणि पुष्प देऊन सत्कार केला.यावेळी आश्रमशाळेच्या प्राचार्या रोहिणी सावंत आणि शिक्षक वृंद उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावीच्या मुली ग्रिष्मा रसाळ आणि सानिका सावंत तर आभार दहावीची विद्यार्थिनी वैष्णवी मोरे हिने उपस्थितांचे आभार मानले.