सोमेश्वरनगर ! वडगाव निंबाळकर येथील तीर्थराज स्वस्त औषधी सेवा जेनेरिक मेडिकल चे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवारसो यांच्या हस्ते संपन्न.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे तीर्थराज स्वस्त औषद सेवा जनरिक मेडिकल चे उद्घाटन समारंभ रविवार दि २७ रोजी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.
तीर्थराज स्वस्त औषद मेडिकल ची वडगाव निंबाळकर येथे तिसरी शाखा असून पहिली शाखा सोमेश्वर करंजेपुल , दुसरी शाखा मोरगाव येथे आहे असे बोलताना मेडिकलचे मालक सणस यांनी सांगितले.
याप्रसंगी सणस परिवारासह सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप व व्हाईस चेअरमन आनंदराव होळकर सह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते तसेच वडगाव निंबाळकर सरपंच सुनील ढोले , उपसरपंच व सदस्य , सदोबाचिवाडी सरपंच ,उपसरपंच व सर्व सदस्य तसेच होळ, को-हाळे पंचक्रोशीतील सर्व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.