Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! उन्हाळ्यात लिंबू सरबत प्यायला गुणकारीच..

सोमेश्वरनगर ! उन्हाळ्यात लिंबू सरबत प्यायला गुणकारीच..
सोमेश्वरनगर प्रतिनिधी - सध्या मार्च महिना लागल्यामुळे उन्हाची चाहूल  सर्वत्रच खूपच  जाणवू लागली आहे. त्यानंतर येणारा मार्च, एप्रिल यामध्ये तर वातावरणात उष्णतेचा प्रचंड उष्णता असते , या पासून आपल्या शरीराचा बचाव किंवा ते मेंटेन म्हणजे सुरक्षित ठेवण्यासाठी माणसे अनेक शक्कल लढवत असतात त्यामध्ये उन्हाळा म्हटलं की थंडपेय ही आलीच त्यामध्ये लिंबू सरबत हे पेय उत्तम पर्याय म्हणून निवडलेला त्यामुळे नागरिक उन्हाळ्यात लिंबू-पाणी प्यायल्याने न केवळ थकवा दूर होतो तर स्थूलपणा कमी होण्यासही मदत होते.  रोज सकाळी लिंबूपाणी प्यायल्याने पोटही साफ होते तर दुपारच्या ऊष्णतेतून शरीर ला थंडावही देते असे  महत्त्व असल्यामुळे उन्हाळ्यात शहरी भागासह ग्रामीण भागात लिंबूसरबत ची मागणी वाढताना दिसत आहे व असे असताना निरा-बारामती रस्त्यालगत अनेक नागरिकांनी व्यवसाय म्हणून लिंबूसरबत चे स्टॉल उभे केले आहे त्याचबरोबर सोमेश्वर कारखाना रस्त्या लगत  असणाऱ्या जुन्या चिंचेच्या झाडाखाली दरवर्षीप्रमाणे वाल्मीक यादव यांनी  नागरिकांच्या सोईसाठी  लिंबू सरबत स्टॉल उभे केले आहे. तर यादवांच्या स्टॉलवर कारखाना कामगार तसेच सोमेश्वर नगर हे मुख्य बाजारपेठ असल्याने सर्व व्यवसायिक व कामानिमित्त ये जा करणारे  वाटसरु आवर्जुन  जुन्या चिंचेच्या वटवृक्षाच्या सावलीत लिंबू सरबत  आस्वाद घेत असतात उष्णतेने लाहीही होत असलेल्या शरीराला सरबत पेत थंड करून समाधानही व्यक्त करत असतात  असे बोलताना यादव यांनी सांगितले.

  अंगाची लाही लाही करणा-या उन्हाळ्यात उकाड्यामुळे घसा कोरडा पडतो. अशा वेळी ही कोरड घालवण्यासाठी, आलेला थकवा दूर करण्यासाठी गारेगार असे लिंबू-पाणी प्यावे असे वाटते. उन्हाळ्यात लिंबूपाणी पिणे हे अनेक त्रासांवर रामबाण उपाय ठरु शकते. उन्हाळ्यात आलेला थकवा, अशक्तपणा घालवण्यासाठी लिंबूपाणी  फायदेशीर ठरु शकते. लिंबूपाण्यामुळे शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडण्यास मदत होते आणि पोटही साफ होते.  उन्हाळ्यात लिंबू-पाणी प्यायल्याने न केवळ थकवा दूर होतो तर स्थूलपणा कमी होण्यासही मदत होते. उन्हाळ्यास रोज सकाळी लिंबूपाणी प्यायल्याने पोटही साफ होते.
त्यामुळे लिंबू सरबत पिण्याची महत्व आहे
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
दरवर्षी लिंबू सरबत व्यावसाय करणे  म्हणजे या व्यवसायातून अनेक नागरिकांचे शरीरातील आजार लिंबू सरबत पिल्याने दूर होतात याचे मला समाधान आहे.म्हणून मी  सोमेश्वर करखाना रोड लगत जुन्या चिंचेच्या झाडा खाली मी लिंबू सरबत चे स्टॉल लावत असतो.

व्यवसायिक वाल्मिक यादव करंजेपुल,सोमेश्वरनगर
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test