महिला दिन विशेष ! गृहउद्योगला चालना देत थोरातबाई यांनी पेलली कुटूंबाची जबाबदारी...!
सोमेश्वरनगर - सखाराम थोरात (सोरटेवाडी ता.बारामती ) हे होळ येथे असणाऱ्या आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट यामध्ये कृषी अधिकारी म्हणून काम पाहत होते , वयाच्या 52 वर्षी थोरात यांचे अल्पशा आजाराने निधन झाले ..त्यानंतर त्यांच्या पत्नी विद्या सखाराम थोरात यांच्यावर कुटूंब जबाबदारी पडली व ते सावरत असताना इतर कोणताही आधार नसल्याने त्यांच्या मनात आलेली संकल्पना म्हणजे रोजच्या जीवनात लागणारे काही पदार्थ त्यातीलच उन्हाळी काम हे महिलांच्या दृष्टीने किचकट काम असून ग्रामीण भागात व शहरी भागात याला खूप महत्त्व व मागणीही आहे,कारण सणवार व उपास यावेळेस हे पदार्थ मनुष्य अगदी चवीने व रुचकर पद्धतीत खात असतात , त्यामुळे याला शहरासह ग्रामीण भागातही मागणी असते ही संकल्पना मनी ठेवत
त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी गृह उद्योग म्हणून उन्हाळीकाम मध्ये कुरडया ,पापड ,लोणचे,सांडगे, उडीद पापड ,तांदळाचे पापड ,उपवासाला लागणारे वेपर्स, शभूदानचे पापड हे गृह उधोग सुरू केले एक मुलगा मदतीला असताना व तिथून पुढे त्याचा विवाह झाल्यानंतर त्यांच्या पत्नी यांचा हातभार त्यांना चांगलाच लागला व बारामतीतील सोरटेवाडी गाव व सोमेश्वर पंचक्रोशीत त्यांना उन्हाळी काम असणारे पदार्थांना ग्राहकांना खरेदी साठी मागणी वाढली व सध्या त्यांचा व्यवसाय उत्तम रित्या चालू असून त्यांनी कुटुंबाची जबाबदारी अतिशय निष्क्रिय पणे पार पाडली असून त्यांचे परिसरातून कौतुकही होत आहे.