इंदापूर ! पतंजली योग समिती इंदापुर यांच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा
इंदापुर दि.8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला पतंजली योग समिती तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्ष मा श्रीमती पद्माताई भोसले तसेच इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष अंकिता शहा, लता माने मा.नगसेवीका वर्षा मखरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते सर्व उपस्थित मान्यवरांचा महिला पतंजली समितीच्या वतीने अध्यक्ष माया विंचू व त्यांच्या सर्व महिला सहकारी यांच्या शुभ हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी योगाचा जागर हे श्रीमती राजश्रीताई शिंदे लिखीत पथनाट्य सर्व महिलांनीसादर केले,त्यामध्ये अर्चना शेवाळेे, शोभा फासे , प्रतिभा गुजराती ,कल्पना भोर, माया विंचू , स्वाती जाधव, सुरेखा लिंबोळी , नीता नलवडे , इंदू बोराटे , सुवर्णा कासार , अंजू ढोले , कु राजनंदिनी जाधव यांनी सहभाग घेतला होता. सदर पथनाट्य पाहून उपस्थित मान्यवर यांनी शुभेच्छा देत असताना या कार्यक्रमाचे तोंड भरून कौतुक केले व खास करून महिलांचे अभिनंदन केले तसेच उपस्थित पुरुष तथा महिला साधक सुद्धा भारावून गेले योगाचे महत्व यामध्ये स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आले होते. यानंतर प्रश्नमंजुषा घेण्यात आली यामध्ये महिलांच्या संबंधातील प्रश्न उपस्थितांना विचारण्यात आले. मंत्री हर्षवर्धन पाटील व दशरथ माने , भागवत गटकुळ तसेच महिला मधून अर्चना शेवाळे व शोभा फासे यांनी उत्स्फूर्तपणे हास्यसनामध्ये सहभागी होऊन सर्व पुरुष व महिला बांधवांना पोट दुखेपर्यंत हसवले शेवटी सर्व उपस्थित महिला भगिनी यांचे श्री हर्षवर्धनजी पाटील यांच्या वतीने व सर्व मान्यवरांच्या हस्ते शाल व हार देऊन सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पतंजली योग समितीचे अध्यक्ष श्री मदन चव्हाण भारत स्वाभिमान चे अध्यक्ष श्री दत्तात्रेय अनपट किसान सेवा समितीचे अध्यक्ष श्री शहाजी बोराटे मार्गदर्शक भागवत गटकुळ मीडिया प्रभारी जितेंद्र माने , विलास गाढवे, राजाभाऊ सोनमाळी, संजय मोरे , मिलींद कासार , सुधिर मखरे ' दडस सर, राजेद्र चव्हाण सर व पतंजली चे सर्व योग कार्यकर्ते योग साधक महिला भगिनी व पुरुष बांधव यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक माया विंचू यांनी केले आभार प्रदर्शन कल्पना भोर यांनी मानले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता गलांडे यांनी केले या कार्यक्रमास बहुसंख्येने महिला व पुरुष उपस्थित होते