सोमेश्वरनगर ! मु.सा.काकडे महाविद्यालयात खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप
सोमेश्वरनगर: सोमेश्वरनगर येथील मु.सा.काकडे महाविद्यालयात ( ता बारामती ) सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महा विद्यालयाच्या मैदानावर सराव करणाऱ्या ५० गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना IQAC प्रोग्राम अंतर्गत स्पोर्ट्स किट व भरती योग्य क्रीडा साहित्य वाटप महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीशराव काकडे -देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी व्यवस्थापन समितीचे सदस्य भीमराव बनसोडे , नितीन कुलकर्णी, संजय घाडगे, प्रा. महेंद्र जाधवराव, गुलाबराव गायकवाड, धोंडीराम आगवणे प्रा.सौ सुजाता भोईटे, विलासराव बोबडे, प्रा.जगन्नाथ साळवे महाविद्यालयाच्या संस्थेचे सचिव जयवंतराव घोरपडे , सह-सचिव सतीश लकडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास वायदंडे हे होते. उपप्राचार्य डॉ.जया कदम, प्रा.डॉ.प्रवीण ताटे- देशमुख,IQAC समन्वयक संजू जाधव उपस्थित होते.
अध्यक्ष सतीश काकडे- देशमुख यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांनी मैदानावरील पोलीस व सैन्यभरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा पुरवल्या जातील असे सांगून क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन करावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमा दरम्यान नवीन फाईव स्टेशन जिमचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. श्रीकांत घाडगे, सुजित काकडे , शुभम येळे, नितीन जाधव यांनी परीश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ. बाळासाहेब मरगजे यांनी केले. आभार प्रा. दत्तराज जगताप यांनी मानले.