Type Here to Get Search Results !

बारामती ! पिंपळीत जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा.

बारामती ! पिंपळीत जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा.
 
बारामती: जागतिक महिला दिन ग्रामपंचायत पिंपळी लिमटेकच्या वतीने महिला सभा तसेच विविध क्षेत्रात सामाजिक काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करून साजरा करण्यात आला.
  याप्रसंगी उपस्थित महिलांचे स्वागत सरपंच मंगल हरिभाऊ केसकर यांनी केले.
ग्रामपंचायतीच्या वतीने माझी वसुंधरा  ही शपथ घेण्यात आली.माझे गाव हरित गाव,स्वच्छ सुंदर गाव ही संकल्पना राबविली जाणार आहे.
महिला दिन साजरा करणे म्हणजे केवळ महिलांचा आदर-सन्मान करणे असे नसून महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे त्यांना स्वालंबी बनविणे हा आहे.
आजच्या आधुनिक विज्ञान युगात महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने चालावे किंबहुना चालत ही आहेत. सध्या महिला प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत. महान पराक्रमी आदर्श माता तसेच विज्ञानाच्या साह्याने गगन भरारी घेणाऱ्या महिलांचे आदर्श डोळ्यांसमोर ठेवून महिलांनी आर्थिक उन्नती साधावी. महिलांना बचतगट समूहाच्या माध्यमातून एकत्रित येऊन वैयक्तिक किंवा सामूहिक व्यवसाय करता येतील.यासाठी बारामती पंचायत समिती व उमेद विभाग समन्वयक विशाल इंगुले, प्रभाग समन्वयक शुभांगी सूर्यवंशी,संदिप पालवे आदींची मदत होईल अशी माहिती मनोगत व्यक्त करताना पिंपळी गाव बचतगट समूह संसाधनच्या सी.आर.पी.अश्विनी बनसोडे यांनी दिली.
       तसेच त्यांनी ग्रामपंचायतीकडे ग्रामसंघाच्या मिटिंगसाठी स्वतंत्र महिला सभागृह व सभागृहात सोयी सुविधा मिळाव्यात आशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या.त्यास ग्रामपंचायतीच्या वतीने मंजुरी देण्यात आली. 
ग्रामपंचायतीच्या वतीने बचतगट तसेच गावातील महिलांना व्यावसायाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन संचालक संतोषराव ढवाणपाटील व सरपंच मंगल केसकर यांनी दिले.
त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे यांनी महिला प्रशिक्षण, घनकचरा व्यवस्थापन व विविध योजनांची माहिती सविस्तरपणे दिली.
पिंपळी आरोग्य उपकेंद्र सी.एच.ओ. डॉ.दिपाली शिंदे यांनी महिलांच्या आरोग्यविषयक माहिती दिली.
     जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यांतील उत्तजनार्थ महिलांना व कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या सर्व महिलांना पियाजो कंपनी व युवा मिञ संस्था यांचे संयुक्त विद्यमानाने सुरू असलेल्या बाराखडी एक्सप्रेस टीमच्या वतीने बक्षिसे व गिप्ट भेट देऊन गौरव करण्यात आला.
शाळेतील शिक्षका पाटील मॅडम यांच्या रोजेस ग्रुपच्या वतीने मुलांना शैक्षणिक साहित्य व फळे वाटप करण्यात आले.
कार्यकामाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका नंदा शिंदे यांनी केले तर आभार स्वाती ढवाणपाटील यांनी मानले.
यावेळी छत्रपती कारखाना संचालक संतोषराव ढवाणपाटील,सरपंच मंगल केसकर,बारामती संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य सुनिल बनसोडे,उपसरपंच राहुल बनकर, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे,ग्रामपंचायत सदस्या स्वाती ढवाण,अश्विनी बनसोडे,कोमल टेंबरे, मंगल खिलारे,मिनाक्षी देवकाते, निर्मला देवकाते,सदस्य आबासो देवकाते,अजित थोरात, वैभव पवार,अशोकराव ढवाण,हरिभाऊ केसकर,जि.प.शाळा मुख्याध्यापक केशव आगवणे सर,शाळा व्यवस्थापन समितीचे बापूराव केसकर,शिक्षक-शिक्षिका, सावित्री महिला प्रशिक्षण संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा थोरात, ग्रामसंघाच्या अध्यक्षा सानिया इनामदार,सचिव दिपाली राजगुरू तसेच ग्रामस्थ महिला अंजना खोमणे,सुरेखा देवकाते,उर्मिला देवकाते,पोस्टमास्तर प्रमिला कुदळे, ग्रामपंचायत लिपिक अनिल बनकर,ऑपरेटर प्रसन्ना थोरात,अंगणवाडी सेविका,मदतनीस, आशा सेविका ग्रामसंघाची महिला पदाधिकारी,बचतगट सदस्या व महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test