Type Here to Get Search Results !

आगामी काळामध्ये येणाऱ्या महानगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समित्या स्वबळावर लढणार - संदीपजी ताजणे

आगामी काळामध्ये येणाऱ्या महानगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समित्या स्वबळावर लढणार - संदीपजी ताजणे
इंदापूर - पुण्यातील विश्रांतवाडी येथील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात पुणे जिल्हा बहुजन समाज पार्टी राज्यस्तरीय संपर्क अभियान कार्यक्रम ४ मार्च २०२२ रोजी संपन्न झाला.मार्गदर्शन करताना बसपा प्रदेश्याध्यक्ष ॲड. संदीप तांजने म्हणाले की , आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूका स्वबळावर लढणार असून उत्तर प्रदेश मध्ये येणारा रिझल्ट हा महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करेल आणि संघटन बांधणीला बळकटी देण्याचे काम करेल.हर पोलिंग बूथ को जीताना है और  बसपा को सत्ता मैं लाना है या बहन कुमारी मायावतीजी यांच्या घोषवाक्या नुसार पोलिंग बूथ बांधण्याचे काम करून फुले शाहू आंबेडकर मिशन यशस्वी करण्याचे काम केले पाहिजे तरच आपण या देशांमध्ये महाराष्ट्रामध्ये मनुवादी लोकांना थांबू शकतो.

बहुजन समाज पक्ष हा सर्व बहुजनांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असल्याने जिसकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वावर बहुजन समाज पक्ष उमेदवार देणार असल्याचे पक्षाचे प्रदेश सचिव अजितजी ठोकळे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला यांच्या समवेत उपस्थीत प्रदेश महासचिव मा.  सुदीप गायकवाड,प्रदेश सचिव.मा भाऊ शिंदे,मा.अजित ठोकळे, मा सुरेश दादा गायकवाड, अविनाश वानखेडे जिल्हा प्रभारी, मा.रमेश अप्पा गायकवाड,मा अशोक दादा गायकवाड, जिल्हा अध्यक्ष,मा हुलगेश भाई चलवादी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सुशील गवळी ,कोषाध्यक्ष श्रीपती चव्हाण महासचिव,ऍड वैभव चंदनशिवे,सचिव मोहम्मद शफी उपस्थित होते तसेच इंदापूर विधानसभा अध्यक्ष संतोष सवाने इंदापूर तालुका उपाध्यक्ष मनिष कांबळे कोषाध्यक्ष आनंद फङतरे महासचिव दीपक सावंत बामसेफचे प्रवीण चव्हाण बाबासाहेब सावंत कार्यालयीन सचिव गिरीश लोंढे व सर्व जिल्हयातील पदाधिकारी, विधानसभा पदाधिकारी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test