इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांचा सहकारी पतसंस्थेचा तिसरा पॅनल संतोष मोहिते गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली तयार होणार
इंदापुर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ - इंदापुर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये प्रस्तापित दोन्हीही पॅनलने बऱ्याच इच्छुक शिक्षक सभासदांना उमेदवारी न दिल्यामुळे शिक्षक मतदार नाराज आहेत.अशा सर्व नाराज उमेदवार एकत्र घेऊन तिसरा पॅनल तयार करणार असल्याचे मोहिते गुरुजी यांनी सांगितलं. एकूण मतदार ९५० असून त्यांपैकी ४५० महिला मतदार आहेत. प्रत्येक पॅनल मधून ९ ते १० महिलांना उमेदवारी दिली पाहिजे. तसेच अनुसूचित जाती व जमाती यांची एकूण मतदार संख्या १५० पर्यंत आहे त्याना ३-४ उमेदवारी दिली पाहिजे मुस्लिम मतदार ४५ आहेत. त्यांना १-२ उमेदवारी दिली पाहिजे. अशा प्रकारे उमेदवारी प्रस्था्पित पॅनल न दिल्या मुळे बरेच मतदार नाराज आहेत. तसेच उमेदवरामध्ये बरेच जुने लोक असल्यामुळे नवीन लोकांना संधी न दिल्यामुळे ते लोक नाराज आहेत. त्यामुळे तिसरा पॅनल चा पर्याय मतदार शोधात आहेत. जर तिसरा पॅनल उभा राहिला तर अन्याय झालेल्या सभासदांना न्याय आम्ही मिळवून देऊ असे संतोष मोहिते म्हणाले.
झेरो बजेट निवडणूक लढवण्याचा आमचा कार्यक्रम असून तो आम्ही राबविणार असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीना सांगितलं. नाराज इच्छुक उमेदवारांची मीटिंग दिनांक २४ मार्च २०२२ रोजी विश्राम ग्रह इंदापूर येथे संध्याकाळी ७:३० वाजता होणार आहे.