पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या इंदापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सन्मान राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते संपन्न
इंदापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये इंदापूर तालुक्यातील कु. प्रतीक्षा ज्ञानदेव वणवे, चेतन ढावरे, निलेश ओमसे, दीपाली धालपे, अशोक नरुटे, अनिकेत वाघ, शैलेश मोरे, प्राजक्ता श्रीनिवास देवकाते- घुले यांनी यश संपादन करत त्यांची पोलीस उपनिरीक्षक (psi) पदी निवड झाल्या याबद्दल आज राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी त्यांचा निवासस्थानी अंथुर्णे याठिकाणी त्याचा यथोचित सन्मान करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.