आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून मा.मंत्री (कृषि) ना.दादाजी भुसे कृषि क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत.
आंतरराष्ट्रीय महिला दिन दिनांक ०८ मार्च २०२२
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून यावर्षीच्या दिनांक ८ मार्च २०२२ आंतरराष्ट्रीय महिला दिनाला मान्यता मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून मा.मंत्री (कृषि) ना.दादाजी भुसे कृषि क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमामध्ये मा.राज्यमंत्री (कृषि), मा.प्रधान सचिव (कृषि व पदुम), मा.आयुक्त (कृषि) यांचेदेखील मार्गदर्शन लाभणार आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कृषि क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला आपले मनोगत, अनुभवातून इतर महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. सदर कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता कृषी विभागाच्या यूट्यूब चॅनेलवर लाईव्ह प्रसारित होणार आहे. तरी सर्व शेतकरी बंधु-भगिनींनी कृषी विभागाच्या यूट्यूब चॅनेल
https:// www.youtube.com /c/AgricultureDepartmentGoM
या लिंक वर क्लिक करून आपला सहभाग नोंदवावा.