मगरवाडी उपसरपंच पदी सोमनाथ येळे यांची निवड
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत मगरवाडी उपसरपंच निवडणूक सरपंच अजित जालींदर सोरटे यांचे अध्यक्षतेखाली बिनविरोध पार पडली - विदयमान उपसरपंच अमोल नाईक यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर सोमनाथ येळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली .
याप्रसंगी सोमेश्वर साखर कारखाना विद्यमान संचालक व नवनाथ उद्योग समुह अध्यक्ष संग्राम सोरटे , ग्रामपंचायत सदस्य ईशा सोरटे, सुवर्णा मगर, ललिता भोसले, व रामभाऊ शेलार, तात्यासो गायकवाड, दिलीप मगर, राजाभाऊ नाईक, अक्षय हगवणे व इतर ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते . निवडणूक प्रकिया ग्रामसेवक सोनाली जाधव यांनी पार पाडली.