गुणवंत मुला-मुलींचे शासकीय वसतीगृह सामाजिक न्याय विभागाच्या ताब्यात देण्याचे आदेश
पुणे दि.१५: येरवडा येथील गुणवंत मुलींचे शासकीय वसतीगृह व गुणवंत मुलांचे शासकीय वसतीगृहाची कोविड केअर सेंटर म्हणून कोरोना बाधित बंद्यांच्या कारागृहासाठी तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलेली जागा समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांच्या ताब्यात देण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
गुणवंत मुला-मुलींच्या शासकीय वसतीगृहांची क्षमता १०० आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने ही वसतीगृहे सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतरीत करण्याबाबत शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार येरवडा येथील गुणवंत मुलींचे शासकीय वसतीगृह व गुणवंत मुलांचे शासकीय वसतीगृह समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांच्या ताब्यात देण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत.