एस .डी .सह्याद्री पब्लिक स्कूल (CBSE )वाघळवाडी मध्ये शिवजयंती महोत्सव उत्सव जल्लोषात साजरा तर विविध कार्यक्रमांचे आयोजन.
सोमेश्वरनगर , बारामतीतील सह्याद्री पब्लिक स्कूल सीबीएसई येथे शुक्रवार दि 18 रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्या वेळी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांविषयी आपली मनोगते, चारोळी ,पोवाडे सादर केले. तसेच विद्यार्थिनींनी शिवजन्माचा प्रसंग नृत्याच्या माध्यमातून सादर केला.
शिवाजी महाराजांची चातुर्य संघटन, राष्ट्रभक्ती, मातृभक्ती, अशा विविध पैलूंचे दर्शन घडवण्यासाठी मुलांनी विविध कार्यक्रम सादर केले. मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शाळेत शिवाजी महाराज यांच्या विषयी घोषवाक्य व भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
घोषवाक्य स्पर्धेत ....
(प्रथम क्रमांक अनुष्का अमोल गायकवाड)
(द्वितीय क्रमांक देवेंद्र आनंत सकुंडे)
(तृतीय क्रमांक मानसी कमलाकर गायकवाड)
भाषण स्पर्धेत....
(प्रथम क्रमांक शुभ्रा विशाल हंगिरे)
(दुसरा क्रमांक समृद्धी हेमंत सावंत)
(तिसरा क्रमांक मीनाक्षी कपाते )
यांना देण्यात आला होता...
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान अजिंक्य सावंत यांनी भूषविले तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे प्राचार्य श्री वाघमारे सर यांनी मौलिक मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाचे शिक्षक वैशाली गायकवाड व गौरी फरांदे मॅडम तसेच शाळेतील इतर शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते.