बहुजन हक्क परिषद शाखा जेऊरच्या वतीने दिगंबर दुर्गाडे यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
पुरंदर, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह जेऊर ता.पुरंदर येथे बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रा.दिगंबर दुर्गाडे सर यांची दुसऱ्यांदा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक पुणे चेअरमनपदी एकमताने निवड झाल्याबद्दल बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुनिल तात्या धिवार यांच्या हस्ते तर कात्रज दुध संघाच्या संचालक पदी श्री.तानाजीराव जगताप यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल युवा अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,हार देऊन सन्मान करण्यात आला..
श्री.दुर्गाडे सर व सुनिल तात्या धिवार यांनी आपले थोडक्यात मनोगत केले...
सत्कार समारंभ प्रसंगी तात्या बोलताना असे म्हणाले की बँकेच्या माध्यमातून ज्या लोकांना छोटे-मोठे व्यवसाय करायचे आहेत असा लोकांना बँकेच्या माध्यमातून कर्ज प्रकरणे उपलब्द करून द्यावीत..
यावेळी सर म्हणाले की बहुजन हक्क परिषद ही संघटना तात्या च्या मार्गदर्शनना खाली बरेच वर्ष झाले सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनिय काम करत आहे.
त्या संघटनेतील जे पदाधिकारी व कार्यकर्ते अतिशय कौतुकास्पद काम करत आहे यां सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मी मनापासून कौतुक करतो आणि तात्यानी जो कर्ज प्रकरणाविषयी मला सांगितले आहे त्याचा मी नक्की विचार करेन आणि जेवढी कर्ज प्रकरणे मला करता येतील तेवढी मी करून देण्याचा प्रयत्न करीन असा शब्द या सत्कार च्या निमित्ताने देत आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे पुरंदर तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे,संघटनेचे सचिव कैलास धिवार,युवा अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने,जिल्हा अध्यक्ष संतोष डुबल,सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत भोसले,कार्याध्यक्ष पांडुरंग घळगे,प्रकाश जाधव,काशिनाथ जाधव,अनिल भोसले,अर्जुन भोसले,नारायण भोसले,पत्रकार श्रीकांत गायकवाड,मा.सरपंच जनार्दन तांबे,ग्रामपंचायत सदस्य तेजस जाधव,सदस्य प्रतिक धुमाळ, नाभिक संघटना जेऊर अध्यक्ष सागर तावरे,रणजित गायकवाड,मयुर गायकवाड,दिपक भंडलकर,युवा संघटक हेमंत जाधव,सहसंघटक प्रथमेश जाधव,सौ.अलका पवार,आक्का पवार,जिजाबाई केकान आदि संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..
कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुनिल तात्या धिवार यांनी केले तर सूत्रसंचालन कैलास धिवार तसेच कार्यक्रमाचे आभार जिल्हा अध्यक्ष संतोष डुबल यांनी मानले...