Type Here to Get Search Results !

नातेपुते येथे भारतीय पत्रकार संघाचा पदग्रहण सोहळा उत्साहात

नातेपुते येथे भारतीय पत्रकार संघाचा पदग्रहण सोहळा उत्साहात
माळशिरसच्या कार्यकारिणीतील पत्रकार बांधवांना ओळख पत्राचे वाटप...

नातेपुते प्रतिनिधी - भारतीय पत्रकार संघ माळशिरसच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पत्रकार पदग्रहण सोहळा नातेपुते येथील शंकरराव मोहिते पाटील विद्यालयात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला अशी माहिती पत्रकार संघाचे जिल्हा समन्वयक सिकंदर नदाफ यांनी दिली.
      यावेळी भारतीय पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष ऍड. कैलास पठारे पाटील , नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोलवनकर तसेच पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष लतीफ नदाफ, माळशिरसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार साळवे यांसह  कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. चंद्रकांत कोळेकर अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, नगरसेवक दादासाहेब उराडे ग्रामीण रुग्णालय नातेपुतेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नम्रता व्होरा, तसेच डॉ. माधव लवटे डॉ. नरेंद्र कवितके पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार ऍड. पांडुरंग ढोरे ऍड. योगेश तुपे पाटील,जिल्हा समन्वयक सिकंदर नदाफ आदी मान्यवरांच्या हस्ते भारतीय पत्रकार संघ माळशिरसच्या कार्यकारिणीतील पत्रकार बांधवांना ओळख पत्राचे वाटप करून त्यांना मार्गदर्शन देखील करण्यात आले आहे.
याप्रसंगी पत्रकार बशीर शेख, उमेश पोतदार, विलास भोसले रज्जाक नदाफ ,महिला पत्रकार रजनी साळवे, शोभा वाघमोडे यांसह बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित सोरटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुनील साळवे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test