पुणे, दि.18: दुसऱ्या महायुद्धात बॉम्बे अभियांत्रिकी गटात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील सैनिकांनी आपली नावे २२ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पुराव्यासह पुणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात नोंदविण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने (निवृत्त) यांनी केले आहे.