Type Here to Get Search Results !

बहुजन समाज पार्टी इंदापूर विधानसभेची बैठक संपन्न

बहुजन समाज पार्टी इंदापूर विधानसभेची बैठक संपन्न
इंदापूर तालुका प्रतिनिधी-दत्तात्रय मिसाळ
इंदापूर -  नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज   पार्टीच विधानसभेतील कार्यकर्त्यांची बैठक लासुर्णे या ठिकाणी  संपन्न झाली बैठकीमध्ये इंदापूर विधानसभेची नवनियुक्त कार्यकारणी जाहीर करण्यात आली तसेच आगामी काळातील नगरपालिका व पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूका संपूर्ण ताकतीने लढून सर्वच्या सर्व उमेदवार उभा करण्यासाठी पक्षाचा नविन कार्यक्रम आखण्यात आला बहुजन समाज पार्टीच्या पक्षाच्या संघटन बांधणी कङे कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे आणि उमेदवारांची चाचपणी करून वरिष्ठांकडे त्याची माहिती द्यावी असे बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. अजित ठोकळे यांनी कार्यकर्त्यांना निर्देश दिले या बैठकीमध्ये उपस्थितांमध्ये जिल्ह्याचे कोषाध्यक्ष श्रीपती दादा चव्हाण नवनियुक्त प्रभारी प्रदीपजी साबळे जिल्हा सचिव विशाल घाडगे उपस्थित होते विधानसभा अध्यक्ष म्हणून संतोषजी सवाने उपाध्यक्ष म्हणून मनेश कांबळे महासचिवपदी दीपक सावंत कोषाध्यक्षपदी आनंद फडतरे कार्यालयीन सचिव गिरीश लोंढे बामसेफ पदी प्रवीण चव्हाण बी.व्हि.एफ पदी दीपक घाडगे विधानसभा सचिव कैलास शिंगाडे अमोल म्हेत्रे अविनाश देठे अतुल कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली बैठकीला बहुजन समाज पार्टीचे जुने-नवे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test