Type Here to Get Search Results !

शिधापत्रिकाधारकांना १० फेब्रुवारीपर्यंत जानेवारीचे धान्य मिळणार

शिधापत्रिकाधारकांना १० फेब्रुवारीपर्यंत जानेवारीचे धान्य मिळणार
पुणे, दि ९:- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जानेवारी २०२२ चे नियमित व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे मोफत धान्य (गहू व तांदूळ) न घेतलेल्या शिधापत्रिकाधारकांना ते १० फेब्रुवारीपर्यंत रास्तभाव दुकानामधून घेता येईल असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी कळवले आहे.

लाभार्थ्यांना मिळणाऱ्या धान्यांची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या http://mahafood.gov.in या संकेतस्थळावर बारा अंकी ऑनलाईन आर सी (शिधापत्रिका) क्रमांक टाकल्यास उपलब्ध होते अशी माहितीही श्रीमती माने यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test