हर्षवर्धन पाटील यांनी घेतले जोधपुरी बाबांच्या दर्गाहचे दर्शन लुमेवाडी परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध
इंदापूर तालुका प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ
इंदापूर - हाजी हाफिज फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबां (रजि.) च्या दर्गाहमुळे लुमेवाडी (ता. इंदापूर ) चे नाव देशभर पोहोचले आहे. या दर्गाहच्या व परिसराच्या विकासासाठी आपण यापूर्वी कायम सहकार्य केलेले आहेच व आगामी काळातही विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
हर्षवर्धन पाटील हे मंगळवारी (दि.23) नीरा नदीकाठच्या परिसरातील काही गावांमध्ये दौऱ्यावरती होते. यावेळी त्यांनी लुमेवाडी येथील प्रसिद्ध दर्गाहला भेट देऊन जोधपुरी बाबांच्या मजारवरती फुलांची चादर अर्पण झाली व दर्शन घेतले. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी शेती पपांची वीज खंडित मोहीम, शेतकऱ्यांच्या पालखी मार्गाच्या अडचणीसंदर्भातील जागेवरून संबधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. यावेळी जेष्ठ नेते विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, कमालभाई जमादार, शाहीरअल्ली शेख, रमजान जमादार, जाऊद्दीन शेख, अमीन शेख, इसुब शेख, निसार शेख, रमजान शेख, शकूर शेख, दादाभाई मुलाणी, जाकीर शेख, शिवाजीराव माने देशमुख, मुसा पठाण, रज्जाक शेख, हुसेन शेख, अशुदुल्ला पठाण, अमीन जमादार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.