बारामती शहरात २७ फेब्रुवारी रोजी पोलिओ लसीकरण
बारामती दि. २३: बारामती शहरात ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना २७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोलिओचा डोस दिला जाणार आहे.
पोलिओ डोसपासून काही बालके वंचित राहिल्याने पोलिओचे उच्चाटन होण्यास अडथळा होतो. पोलिओ लसीकरण मोहीमेचा सर्वांना सुलभ लाभ मिळावा यासाठी उपजिल्हा रुग्णालयामार्फत एकुण ६२ बुथ तयार करण्यात आले आहेत. सर्व पालकांनी ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस द्यावा, असे आवाहन बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी केले आहे.