बहुजन समाज पार्टी ची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक संपन्न
इंदापूर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ
इंदापूर , बहुजन समाज पार्टीची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक नुकतीच मुंबई या ठिकाणी पार पडली यावेळी बहुजन समाज पार्टी आगामी काळामध्ये होणाऱ्या महानगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पूर्ण ताकतीने लढवणार असल्याचे सांगण्यात आले महाराष्ट्रातील आघाडी सरकार हे महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार ओबीसी आरक्षण या सर्वच मुद्द्यांवर असफल झाले असून लोकांचा सरकारवरील विश्वास उडालेला आहे जनता सरकारच्या निर्णयाविरोधात वेगवेगळी मते मांडत असून महाराष्ट्रात नवा पर्याय शोधत आहे आत्ताच झालेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पक्षाचे दहापेक्षा जास्त उमेदवार निवडून आले असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये बसपा हा एक पर्याय म्हणून उभा राहू शकतो हे दाखवून दिले आहे बहेन कु मायावतीजी यांच्या दिशा निर्देशानुसार व महाराष्ट्रातील प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष संदीपजी ताजने यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात मोठ्या संख्येने कॅडर कॅम्प चे आयोजन करून कार्यकर्त्यांची फौज निर्माण करून संघटन मजबूत केले जात आहे असे प्रदेश सचिव अजितजी ठोकळे यांनी सांगितले *हर पोलिंग बूथ को जितना है बसपा को सत्ता मे लाना है* या घोषवाक्या नुसार मार्च महिन्यापासून *सत्ता प्राप्त करो * अभियानाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून प्रभाग पद्धतीनुसार निवडणुका कार्यक्रम लागण्याची शक्यता असल्याने प्रत्येक प्रभागांमध्ये 200 ते 300 मिटींगचे आयोजन करण्यात आले आहे बैठकीमध्ये बसपाच्या विधानसभा जिल्हा कार्यकारणी मध्ये 50 टक्के पेक्षा जास्त युवकांना संधी देणार असल्याचे प्रदेश सचिव अजितजी ठोकळे यांनी यावेळी सांगितले बैठकीसाठी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून अनेक असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.