'जल जीवन मिशन' अंतर्गत पवन मावळमधील कुसगाव प.मा. डोणे, आढले बुद्रुक, दिवड, ओव्हळे, शिवणे येथील नळ पाणी पुरवठा योजनांचा भूमिपूजन समारंभ संपन्न.
पुणे,पवन मावळमधील कुसगाव प.मा. डोणे , आढले बुद्रुक,दिवड, ओव्हळे, शिवणे येथील नळ पाणी पुरवठा योजनांचा भूमिपूजन समारंभ सौ. सारिकाताई सुनिल आण्णा शेळके (संस्थापिका कुलस्वामिनी महिला मंच) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
'जल जीवन मिशन' अंतर्गत कुसगाव प.मा. योजनेसाठी १ कोटी १२ लक्ष, डोणे, आढले बु||, दिवड, ओव्हळे या गावांच्या योजनेसाठी ३ कोटी २५ लक्ष, शिवणे ९५ लक्ष रू. निधी मावळचे लोकप्रीय कार्यसम्राट आमदार श सुनिल आण्णा शेळके यांच्या माध्यमातुन उपलब्ध झाला आहे. जल जीवन मिशन अंतर्गत दुसऱ्या टप्प्याला प्रशासकीय मान्यता मिळाली असुन नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी एकुण ३२ कोटी इतका भरघोस निधी दिल्या बद्दल पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे व मावळचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट आमदार श्री सुनिल आण्णा शेळके यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष मा.श्री.पै. सचिनभाऊ घोटकुले, पंचायत समिती सदस्य श्री.साहेबराव कारके, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष सौ.सुवर्णाताई राऊत, कल्पेश मराठे, अजिंक्य टिळे, तसेच सर्व ग्रामपंचायतींचे सन्माननीय सरपंच, उपसरपंच, सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, महिला भगिनी, ग्रामस्थ, तरूण सहकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.