Type Here to Get Search Results !

कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही काटकसर नको - अंकिता पाटील ठाकरे

कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही काटकसर नको - अंकिता पाटील ठाकरे
1 कोटी 7 लाख 50 हजार रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण अंकिता पाटील ठाकरे यांच्या शुभहस्ते संपन्न.

निमगाव केतकी प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ

शेळगाव गावासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा परिषद सदस्या सौ.अंकिता पाटील ठाकरे यांच्या विशेष सहकार्याने जिल्हा परिषद सदस्या सौ. भारती मोहन दुधाळ यांनी 1 कोटी 7 लाख 50 हजार रुपये निधी मंजूर करून गावातील सर्वांगीन विकासासाठी निधी उपलब्ध केला आहे. या मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन पूर्ण झालेल्या विकास कामांचे लोकार्पण जिल्हा परिषद सदस्य सौ अंकिता पाटील ठाकरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

व्याहळी शिव लक्ष्मी मंदिर ते शेळगाव निमगाव रस्ता साठी 5 लक्ष, शेळगाव निमगाव रोड ते मुसाभाई फार्म हाऊस कडे जाणारा रस्तासाठी 5 लक्ष, शेळगाव निमगाव रोड ते गोडसे मळा ते पवार सर यांचे घराकडे जाणारा रस्ता साठी 5 लक्ष, दादा राम बनसोडे नाझरकर वस्ती ते भीमराव बनसोडे बंगला रस्तासाठी 5 लक्ष, शंकर कांबळे वस्ती ते मदने गुरुजी वस्ती अंथूर्णे रस्तापर्यंत रस्तासाठी 5 लक्ष, अंगणवाडी इमारत बांधकाम कामाचसाठी 8.50 लक्ष, नवीन अंगणवाडी इमारत बांधकाम कामाचासाठी 8.50 लक्ष, शेळगाव वैदवाडी येथील लक्ष्मी मंदिर सभामंडप साठी 4 लक्ष, शेळगाव वैदवाडी लमाण वस्ती ते भगवान जाधव वस्ती मनोहर गावडे वस्ती रस्ता साठी 25 लक्ष, लमान बाबा मंदिर सभामंडप बांधकामसाठी 3 लक्ष, माळी वस्ती (दुधाळ मळा) लक्ष्मी मंदिर सभामंडप बांधकामसाठी 5 लक्ष, भुजबळ वस्ती अंगणवाडी इमारतीसाठी 8.50 लक्ष, कोळकी बंदीस्त गटारसाठी 5 लक्ष, शेळगाव (तेल ओढा)संभाजी जाधव वस्ती पिण्याच्या पाण्याची टाकी बांधकामासाठी 5 लक्ष, मोहिते वस्ती येथील पिण्याच्या पाण्याची टाकी वाढीव बांधकामासाठी 5 लक्ष व मोहिते वस्ती येथील रस्ता भूमिपूजन 5 लक्ष रुपये निधी असा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास निधीतून गावातील सर्व विकासकामे दर्जेदार व उत्तम गुणवत्तेचे करणार आहोत. असा सौ.अंकिता पाटील ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य देवराज जाधव, कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक आबासाहेब शिंगाडे, राहुल जाधव, मोहन दुधाळ,भगवान जाधव,
ग्रामपंचायत सदस्य अश्विनी आजिनाथ जाधव, सोनाली बापू वाघमोडे व इतर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test