हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते इंदापूर तालुका वकील संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
इंदापूर तालुका प्रतिनिधी- दत्तात्रय मिसाळ
इंदापूर - इंदापूर तालुका वकील संघटना सन 2022-23 च्या अध्यक्ष पदी ॲड.मनोहर नाना चौधरी,उपाध्यक्ष पदी ॲड.जमीर मुलाणी, ॲड.सुभाष भोंग,सचिव पदी-ॲड.अशितोष भोसले,खजिनदार पदी - ॲड.राजेंद्र ठवरे,सदस्य पदी ॲड.रुद्राक्ष मेणसे याची बिनविरोध निवड झाली असून आज इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो याठिकाणी राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हर्षवर्धन पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विविध विषयावर संवाद साधला.