Type Here to Get Search Results !

इंदापूर ; तालुक्याचा विकास करणे हे येड्या गबाळ्याचे काम नाही ; विकास कामे करणे हे माझ्या रक्तातच - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

इंदापूर ; तालुक्याचा विकास करणे हे येड्या गबाळ्याचे काम नाही ; विकास कामे करणे हे माझ्या रक्तातच - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
इंदापूर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ

इंदापूर -  इंदापूर तालुक्यातील कौठळी येथील विविध विकास कामांचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की मी गेल्या सात वर्षापासून इंदापूर तालुक्याचा चौफेर विकास केला असून इंदापूर तालुक्याचा विकास करणे हे येड्या गबाळ्याचे काम नाही असा खोचक टोला विरोधकांना केला आहे.

पुढे बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की इंदापूर तालुक्यात सर्व रस्त्यांची यांची कामे केली. पद हे मिरवायचे नसते तर सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी असते तसेच इंदापूर तालुक्यातील गोरगरीब, दलित, मागासवर्गीय, सर्वसामान्य जनतेने मला भरघोस मतदान करून निवडून दिले त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले. त्यामुळे मी या गावचा विकास मोठ्या प्रमाणात केल्याशिवाय गप्प बसणार नाही असेही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.

येणाऱ्या काही दिवसात इंदापूर तालुक्यात शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांची विकास कामे मंजूर होणार असून इंदापूर तालुक्यात चौफेर विकास होणार आहे. पाण्याच्या प्रश्नाबाबत इंदापूर तालुक्यात काय करायचे व पाणी कसे आणायचे हे मी बघतो. गेल्यावेळी पाण्याबाबत इंदापूरच्या काही मंडळींनी सोलापूर वाल्यांचा गैरसमज केला असा आरोप राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला. 

आता फक्त एक काम राहिले आहे शेतीच्या पाण्याचे ज्यावेळी खडकवासल्याचे पाणी माझ्या शेतकऱ्याच्या शेतात बाराही महिने येईल तेव्हा मला व्यवस्थित झोप येईल. माझ्या शेतकऱ्याच्या शेतीच्या पाण्यासाठी भविष्यात जे काही करता येईल ते करण्याचे काम मी करणार आहे असेही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.

इंदापूर तालुक्यातील व्यक्ती मुंबई मध्ये वैद्यकीय उपचार घेत आहे. तसे पुण्यामध्ये ही गरीब कुटुंबातील अनेक लोक उपचार घेत आहेत. त्या सर्व लोकांना व्यवस्थित औषध उपचार मिळण्यासाठी मी मोठ्याप्रमाणात काम केले आहे. मी शासनाच्या वतीने महात्मा फुले आरोग्यदायी योजनेच्या माध्यमातून काही मदत करता येईल तेवढी करण्याचे काम केले आहे असेही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.

 यावेळी तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्यअध्यक्ष अतुल झगडे, प्रताप पाटील, सागर मिसाळ, सतिश पांढरे, कौठळी गावचे सरपंच नंदा चोरमले, उपसरपंच सुनील खामगळ, वसंत मारकड यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
इंदापूर तालुक्याचा चौफेर विकास करत असताना आमच्या कौठळी सारख्या छोट्या गावात  कोट्यवधीचा निधी देऊन कौठळी गावात विकासगंगा आणली. कोणत्याही कठीण प्रसंगी दिलेला शब्द पाळणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे भरणे मामा जेवढं माझ्यासाठी माझ्या बापाने केलं तेवढेच भरणे मामांनी माझ्यासाठी केलं.
    हमा पाटील सोशल मीडिया प्रमुख इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test