Type Here to Get Search Results !

इंदापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसाठी ८ कोटी ५ लाखांचा निधी मंजूर

इंदापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसाठी ८ कोटी ५ लाखांचा निधी मंजूर
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली माहिती
 
निमगाव केतकी प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ

इंदापूर, इंदापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ८ कोटी ५ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.  हा निधी शासकीय आरोग्य संस्थेचे श्रेणी वर्धन व बांधकामासाठी आशियाई विकास बँक यांच्या माध्यमातून उपलब्ध केला असल्याची माहिती राज्यमंत्री भरणे यांनी दिली.

इंदापूर तालुक्यातील पिटकेश्वर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र काटी १५ लाख, फोन कुळवाडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र १ कोटी १५ लाख, बोरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र २ कोटी ३० लाख, अगोती नं. १ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र १ कोटी १५ लाख, अंथुर्णे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र १ कोटी १५ लाख, डाळज नं. १ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र १ कोटी १५ लाख असे एकूण सहा ठिकाणी ८ कोटी ५ लाख रुपये मंजूर करण्यात आला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत वेळोवेळी नवीन आरोग्य संस्था स्थापनेस श्री निवेदन मान्यता देण्यात आली आहे प्रामुख्याने बांधकाम यंत्रसामग्री उपकरणे तसेच मनुष्यबळ उपलब्ध करणे करता राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो सध्या सुरू असलेल्या कोवीड १९ च्या संसर्गजन्य आधाराच्या अनुषंगाने उपचारात आवश्यक बदल व आधुनिक सुविधांवर भर दिला जातो सदर कामे मंजूर झाल्याने तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अधिक क्षमतेने काम करू शकेल अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री भरणे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test