Type Here to Get Search Results !

पुलवामा हल्ल्याला आज झाली तीन वर्ष पूर्णआजी-माजी सैनिक संघटना यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण.

पुलवामा हल्ल्याला आज झाली तीन वर्ष पूर्ण
आजी-माजी सैनिक संघटना यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण.

14 फेब्रुवारी 2019 ला संपूर्ण देश रडला

सोमेश्वरनगर -  जगभरात आजच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारी हा दिवस 'व्हेलेंटाईन डे' म्हणून साजरा केला जातोय. मात्र, तीन वर्षांपासून हाच दिवस देशासाठी आणि भारताच्या जवानांसाठी काळा दिवस ठरला.

 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी दहशतवादी हल्ला करून हा दिवस रक्तरंजित केला. पुलवामा हल्ल्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. पुलवामा जिल्ह्यात स्फोटकांनी भरलेल्या गाडीनं सीआरपीएफच्या जवानांच्या बसला धडक दिली. त्यात 40 जवान शहीद झाले. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले. त्या...दहशवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहिद झाले होते.  
    आज देशभरात या शहिदांना श्रद्धांजली वाहिली जात असते सोमवार दिनांक 14 रोजी बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे आजी-माजी सैनिक संघटना,सोमेश्वर स्पोर्ट एकँडमी व सैनिक स्वयं सहाय्यता महिला बचत गट यांच्या वतीने दर वर्षी प्रमाणे याही  वर्षी  जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

    याप्रसंगी  संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, संघटना कोर कमिटी सदस्य माजी सैनिक बाळासाहेब गायकवाड,किरण सोरटे, अनिल चौधरी ,भारतीय पत्रकार संघ बारामती तालुका उपाध्यक्ष विनोद गोलांडे , विवेकानंद अभ्यासिका अध्यक्ष गणेश सावंत सह  मान्यवर उपस्थित होते.




 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test