Type Here to Get Search Results !

वाघळवाडी-सोमेश्वरनगर मध्ये महिला बचत गटांना ४५ लाख रुपयांचे कर्ज वाटप

वाघळवाडी-सोमेश्वरनगर मध्ये महिला बचत गटांना ४५ लाख रुपयांचे कर्ज वाटप
सोमेश्वरनगर - बारामतीतील वाघळवाडी महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावेत व स्वावलंबी व्हाव्यात या दृष्टीने महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती मार्फत विविध योजनांचे आयोजन करण्यात येते त्यादृष्टीने पंचायत समिती बारामती यांनी उमेद (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) मधून वाघळवाडी २६ महिला बचत गटांची स्थापना करून ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले व १० ते १२ महिला बचत गटांचे उघडण्याबाबत चे काम काय चालू आहे. HDFC बँक बारामती यांनी वाघाळवाडी तील १८ महिला बचत गटांना ४५ लक्ष इतके अर्धा (०.५) टक्के व्याजदराने कर्ज मंजूर केले व उर्वरित सर्व बचतगटांना कर्ज मंजूर करण्याचे कामकाज चालू आहे.
 
      पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्री संभाजीनाना होळकर यांच्या हस्ते या सर्व बचत गटातील महिलांना चेकद्वारे कर्ज वाटप करण्यात आले. त्यांनी मनोगतामध्ये माजी कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या प्रयत्नामुळे आज महिला समाजामध्ये उंच मानेने कामकाज करत आहेत त्यांनी ५०% आरक्षण देऊन महिलांची हित जोपासण्याचे काम केले खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून वाघाळवाडी एवढ्या मोठ्या प्रमाणात बचत गट स्थापन झाले व महिला एकत्र आल्या ही बाब कौतुकास्पद आहे आणि वाघाळवाडी तील महिला खूप सक्षम आहेत असे बचत गटातील सहभागवरुन दिसून येते. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार व सुप्रियाताई सुळे दिली जाईल. तसेच बचत गटातील महिलांनी व्यवस्थित रित्या कर्जफेड करून आपले व्यवसाय व आर्थिक परिस्थिती चांगली करावी. गावातील विकास कामांना कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही वाघळवाडी गावाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी २० कोटी रुपये प्रस्ताव मंजूर झालेला आहे त्याची लवकरात लवकर काम चालू करण्यात येईल तसेच आरोग्य केंद्र, वन उद्यान यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे आपल्या मनोगतात म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच व वाघळवाडी महिला ग्रामसंघाच्या अध्यक्ष नंदाताई सकुंडे होत्या त्यांनी आपल्या मनोगतामध्ये गावातील सर्व महिलांना बचत गटात सामावून घेऊन प्रयत्न त्यांना आर्थिक व सामाजिक सक्षम  करणार असल्याचे सांगितले तसेच बचत गटांना लागणारी सर्व मदत ग्रामपंचायत वाघळवाडी यांच्या माध्यमातून करण्याचे प्रयत्न केले जातील. तसेच त्यांनी गावाला लवकरात लवकर वरिष्ठ पातळीवरून स्मशानभूमी होण्यासाठी व जागा मिळवण्यासाठी संभाजी होळकर यांच्याकडे केली मागणी केली. 
      पंचायत समिती बचत गट अधिकारी विनोद लेंडगे  यांनी सर्व बचत गटातील अध्यक्ष सचिव व सभासद महिला यांना मिळणारे कर्जाची रक्कम चांगल्या कामासाठी वापर करावा व आपले कुटुंब आर्थिक सक्षम होईल याकडे लक्ष द्यावे व वेळच्या वेळी महिलांनी व्यवस्थित रित्या कर्जफेड करावी व आपले आर्थिक नियोजन करावे असे आवर्जून सांगितले व सर्व बचत गटांना १५,०००/-  रुपये अनुदानासाठी पात्र आहेत ते लवकरच जमा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल व PDCC बँकेचे प्रतिनिधी म्हणून श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक पदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या, महिला वतीने संभाजी होळकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
    या कार्यक्रमाला  HDFC बँकेचे अधिकारी  संजय जाधव , माधुरी लोंढे  ग्रामपंचायत सदस्य उमश्री.पांडुरंग भोसले,हेमंत गायकवाड, उद्योजक  मयूर बोबडे, राष्ट्रवादी तालुका महिला सरचिटणीस सुचिता साळवे.  बापूराव सावंत, विकास सावंत, अमित गायकवाड,  ग्राम संघाच्या कार्याध्यक्ष मालन सावंत सचिव अनिता शिंदे,  खजिनदार मनीषा जितेंद्र सकुंडे व सर्व बचत गटातील अध्यक्ष, सचिव व सर्व सभासद महिला उपस्थित होत्या.
 कार्यक्रमाचे स्वागत व आभार युवा कार्यकर्ते तुषार सकुंडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test