सुपे येथे शिवशक्ती चषकाचे आयोजन
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सुपे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्तानं शिवशक्ती चषक भव्य टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार, बारामती तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर, बारामती नगर परिषदेचे गटनेते सचिन सातव, बारामती दुध संघाचे चेअरमन संदिप जगताप यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेचे पारितोषिक अनुक्रमे १ लाख, ५१ हजार, ३१ हजार, २१ हजार, ११ हजार विजेत्यांना देण्यात येणार आहे तसेच वैयक्तिक आकर्षक पारितोषिकही दिले जाणार आहे. यावेळी पंचायत समिती मा. सभापती पोपट पानसरे,कौले बापु, हनुमंत शेळके,अध्यक्ष रवींद्र माने,बाळासाहेब चव्हाण पी.एस.आय.शेख साहेब युवा नेते अतुल विलासराव खैरे खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन दत्तात्रय कुतवळ, संपत जगताप, अनिल हिरवे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शौकत कोतवाल,अशोक लोणकर, उपस्थित होते.नितीन खैरे,राजाराम खैरे, सनी खैरे, श्रीकांत खैरे, विवेक खैरे, मनोज खैरे, मयुर जाधव, गणेश खैरे, निलेश खैरे, प्रशांत खैरे, महेंद्र खैरे, अमित खैरे शेखर खैरे धीरज खैरे यांनी शिवशक्ती चषकाचे आयोजन केले आहे.